GRAMIN SEARCH BANNER

राजापूरच्या तत्कालीन तहसीलदार प्रतिभा वराळे यांची सिंधुदुर्गात उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती

Gramin Varta
387 Views

तुषार पाचलकर / राजापूर : येथील तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार प्रतिभा वराळे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली असून त्यांची नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (महसूल जनरल) म्हणून करण्यात आली आहे.

2017 ते 2021 या काळात त्या राजापूर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. या काळात त्यांनी प्रभावी प्रशासन, नागरिकाभिमुख भूमिका आणि शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करून आपली वेगळी छाप उमटवली. त्यानंतर 2021 ते 2024 दरम्यान त्यांनी गुहागर येथे तहसीलदार म्हणून कार्य केले, तर 2024 पासून आतापर्यंत त्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (MMRDA) मेट्रो प्रकल्पासाठी भू संपादन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

राजापूर तालुक्यातील त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रलंबित प्रशासकीय विषय मार्गी लागले, तर नागरिकांच्या तक्रारींना संवेदनशीलतेने हाताळत त्यांनी प्रशासन आणि जनतेतील विश्वास दृढ केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती दिली आहे.

प्रतिभा वराळे यांच्या या पदोन्नतीबद्दल राजापूर तालुक्यातील नागरिक, सहकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्गात आनंद व्यक्त केला जात असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3366985
Share This Article