GRAMIN SEARCH BANNER

१३ वर्षांचा जीवन संघर्ष थांबला, देशातील पहिले दयामरण; हरीश राणाने घेतला जगाचा निरोप

Gramin Varta
386 Views

नवी दिल्ली: देशात दयामरणाची अनुमती मिळालेले पहिले व्यक्ती ठरलेल्या हरीश राणा याची मंगळवारी दिल्लीतील एम्समध्ये प्राणज्योत मालवली. गेल्या १३ वर्षांपासून कोमात असल्याने त्याला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.

ताे पंजाब विद्यापीठामध्ये बी. टेकचे विद्यार्थी होता.

२०१३मध्ये एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ताे कोमात गेला. ३१ वर्षीय राणा याला दयामरण द्यावे, असा सर्वोच्च न्यायालयाने ११ मार्च रोजी ऐतिहासिक निर्णय दिला. रुग्णाला हळूहळू मृत्यू येईल, अशा पद्धतीनं जीवनरक्षक प्रणाली हटवा, अशा सूचना न्यायालयानं एम्सला दिल्या होत्या. त्याचे दिल्ली एम्सने पालन केल्यानंतर हरिश राणा याची प्राणज्योत मालवली.

Total Visitor Counter

3372025
Share This Article