GRAMIN SEARCH BANNER

भाजीचा कुकर उघडताना खेडमधील १३ वर्षीय बालिका गंभीर भाजली

Gramin Varta
176 Views

रत्नागिरी: घरगुती कामात किंवा जेवण वाढताना होणारी थोडीशी घाई किती अंगलट येऊ शकते, याचा प्रत्यय खेडमध्ये आला आहे. खेड येथील भरणे नाका ग्रामपंचायत परिसरातील वर्षा सोमनाथ जाधव ही १३ वर्षीय बालिका भाजीचा कुकर उघडताना त्यातील गरम वाफेमुळे गंभीररीत्या भाजली आहे. तिला अधिक उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवार १२ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. वर्षाला भूक लागल्यामुळे तिने आईने गॅसवर शिजवून ठेवलेल्या भाजीचा कुकर स्वतः उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुकरमधील वाफ पूर्णपणे न गेल्याने, झाकण उघडताच गरम वाफेचा मोठा झोत तिच्या अंगावर आला. या वाफेमुळे वर्षाचा चेहरा, छाती आणि पोटाचा भाग गंभीरपणे भाजून त्यावर फोड आले आहेत. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने तिला खेडमधील कळंबणी रुग्णालयात उपचारांसाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, प्रकृतीचे गांभीर्य ओळखून तिला १९ मार्च रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेची जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3357471
Share This Article