रत्नागिरी : नवरात्र उत्सवानंतर पारंपरिकरित्या करण्यात येणारा होम कार्यक्रम यंदाही रत्नागिरीतील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवती मंदिरात पार पडणार आहे.
हा धार्मिक कार्यक्रम सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त, मानकरी, ग्रामस्थ तसेच भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन व धार्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी भगवती मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
रत्नदुर्ग किल्ल्यावर देवी भगवती होम कार्यक्रमाचे आयोजन
