GRAMIN SEARCH BANNER

भोंदूबाबा अशोक खरातवरील कारवाई नियोजनबद्ध ! – मुख्यमंत्री

Gramin Varta
191 Views

मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. १० मार्च या दिवशी अन्य जिल्ह्यातील तक्रारीच्या आधारे कारवाईची सिद्धता करण्यात आली होती. भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर पोलिसांची कारवाई नियोजनबद्ध होती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या आधारे भोंदूबाबा खरात याच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांच्याशी जोडलेले मंत्र्यांचे त्यागपत्र घ्यावे, अशी मागणी सभागृहात केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ”भोंदूबाबा अशोक खरात या त्यांच्याकडील तथाकथित शक्तीचा दुरुपयोग करून दिशाभूल करून अनेक महिलांसमवेत दुष्कृत्य केल्याचे समोर येत आहे. याविषयी अनेक महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हत्या. त्यांना धीर दिल्यानंतर काही महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. येत्या काही दिवसांत अन्यही काही महिला तक्रार नोंदवतील. ही घटना राजकारण करण्याची नाही, तर महिलांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. समर्पन करणे हे स्वत:चे कर्तव्य आहे, अशा प्रकारे महिलांचा बुद्धीभेद करण्यात येत होते. याविषयी २४ मार्च या दिवशी सभागृहात मी सखोल निवेदन करणार आहे.”

चर्चेच्या मागणीसाठी सभागृहात गोंधळ !

भोंदूबाबा अशोक खरात याने केलेल्या फसवणुकीविषयी सभागृहात चर्चा घेण्यात यावी, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहात मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्या सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगूनही सत्ताधारी आणि महाविकास आघाडी यांच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.

Total Visitor Counter

3392347
Share This Article