GRAMIN SEARCH BANNER

हातिवले टोलविरोधात राजापूर तालुका एकवटला;टोलमाफीसाठी सर्वपक्षीयांचा इशारा

Gramin Varta
133 Views

राजापूर / प्रतिनिधी– मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील येथे टोल वसुली पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना राजापूर तालुक्यातून तीव्र विरोध होत आहे. टोल सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत स्थानिकांना टोलमाफी देण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

सकाळपासून तालुक्यातील विविध भागांतून नागरिक हातिवले येथे जमा झाले. यावेळी च्या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप उपस्थितांनी केला. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.

“निकृष्ट दर्जाचा रस्ता देऊन आता टोल वसुली करणे म्हणजे कोकणवासीयांची पिळवणूक आहे,” अशा शब्दांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. यापूर्वीही दोन वर्षांपूर्वी येथे टोल सुरू करण्यात आला होता; मात्र स्थानिकांच्या आंदोलनामुळे आणि यांच्या पुढाकाराने तो बंद करण्यात आला होता.

दरम्यान पुन्हा टोल सुरू करण्याच्या हालचालींमुळे सर्वपक्षीय एकत्र येत प्रथम निवेदन देण्यात आले असून गरज पडल्यास आंदोलन छेडण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

निवेदनात महामार्गावरील अनेक गंभीर त्रुटी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. समोरील काम अपूर्ण असून वारंवार अपघात होत असल्याचे नमूद करण्यात आले. भू-संपादन झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले असून पर्यायी मार्ग उपलब्ध नाहीत. तसेच सर्विस रोड, बस स्टॉप, पिकअप शेड, स्ट्रीट लाईट, वृक्षलागवड यांसारखी कामे अपूर्ण असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

याशिवाय अपघाताच्या प्रसंगी रुग्णवाहिका, क्रेन, शौचालय, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची गंभीर बाबही निदर्शनास आणून देण्यात आली.

हातिवले मार्गावरून राजापूर शहरात नागरिकांना दैनंदिन कामासाठी वारंवार ये-जा करावी लागते. शाळा, महाविद्यालये, दवाखाने, शासकीय कार्यालये आणि बाजारपेठेसाठी दिवसातून अनेक वेळा हा मार्ग वापरावा लागतो. त्यामुळे टोल भरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.

राजापूर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना संपूर्ण टोलमाफी देण्यात यावी, अन्यथा सर्वपक्षीयांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असून हातिवले टोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढील काही दिवसांत हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Total Visitor Counter

3376925
Share This Article