GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष हेमलता बुरटे यांचे निधन

Gramin Varta
11 Views

चिपळूण : येथील नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. हेमलता बुरटे (वय अंदाजे ८५) यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. काही दिवसांपासून त्या अल्पशा आजाराने त्रस्त होत्या आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

हेमलता बुरटे या चिपळूणमधील नामवंत वकील शांतारामबापू बुरटे यांच्या पत्नी होत. बुरटे दांपत्याने सामाजिक व सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घेतला होता. करंजेश्वरी देवस्थान, चिपळूण अर्बन बँक आणि नगर परिषदेसारख्या संस्थांमध्ये शांतारामबापूंचे मोलाचे योगदान होते.

नगरसेविका आणि नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना हेमलता बुरटे यांनी अभ्यासू, आक्रमक आणि लोकहितैषी नेतृत्वाची छाप पाडली. त्यांच्या कार्यकाळात शहरातील नागरी सुविधा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले गेले.

त्यांच्या निधनामुळे चिपळूण शहरातील सामाजिक, राजकीय आणि नागरी क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चिपळूण नगर परिषद, चिपळूण अर्बन बँक, करंजेश्वरी देवस्थान व इतर सामाजिक संस्थांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. मुलगा पुणे येथे स्थायिक आहे, तर मुलगी सीमा गीड्ये या देवरुख येथे वकिली व्यवसाय करतात.

Total Visitor Counter

2648583
Share This Article