बांगलादेशी महिलेसह 12 आरोपींना अटक
केमिकल फॅक्टरीच्या नावाखाली ड्रग्जचा धंदा
ठाणे: मुंबई पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.मीरा रोड पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ‘एमडी’ म्हणजेच मेफेड्रोन या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. तेलंगणामधील एका केमिकल फॅक्टरीमध्ये हे ड्रग्ज तयार केले जात होते आणि मुंबईमध्ये पाठवले जात होते.या कारवाईसाठी पोलिसांनी मागील एका महिन्यापासून गोपनीयपणे नजर ठेवली होती. त्यानंतर 60 पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकून 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात या रॅकेटचा मुख्य केंद्र होता. येथे पोलिसांनी 12 हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. तपासादरम्यान उघडकीस आले की, तेलंगणामधील एका फॅक्टरीत मागील अनेक वर्षांपासून मेफेड्रोनचे उत्पादन सुरू होते. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 35 हजार लिटर केमिकल साठवलेले आढळून आले, जे या अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी वापरले जात होते. ही ड्रग्ज फॅक्टरी केमिकल युनिट म्हणून नोंदवलेली होती. मात्र प्रत्यक्षात तेथे मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचे उत्पादन आणि त्याचे वितरण सुरू होते. तयार झालेले ड्रग्ज स्थानिक आरोपी आणि एजंटांच्या माध्यमातून मुंबईमध्ये पाठवले जात होते. अंदाजानुसार, आतापर्यंत हजारो किलो मेफेड्रोन बाजारात पुरवले गेले आहेत.
बांग्लादेशी महिला अटकेतया कारवाईदरम्यान पोलिसांनी फातिमा मुराद शेख उर्फ मोल्ला नावाच्या 23 वर्षीय बांग्लादेशी महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून 24 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण 12 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा एक आयटी- एक्सपर्ट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तो केमिकल फॅक्टरीच्या आड या व्यवसायाचा गैरवापर करत होता. या रॅकेटमध्ये परदेशी व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय असून, पोलिस याची सखोल चौकशी करत आहेत.