GRAMIN SEARCH BANNER

एस.आय. ग्रुप आणि सेवा सहयोग फाउंडेशनकडून संगमेश्वर तालुक्यातील १० शाळांना क्रीडा साहित्याची वाटप

Gramin Varta
81 Views

संगमेश्वर: एस. आय. ग्रुप ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नवी मुंबई आणि सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्यातून संगमेश्वर तालुक्यातील १० शाळांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब येथे करण्यात आले होते. याप्रसंगी आंगवली हायस्कुलचे शिक्षक शैलेश कदम, संगमेश्वर तालुका क्रीडा समन्वयक व सोनवडे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक अभिजित कदम आणि विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोसुंब हायस्कूलचे मुख्याध्यापक  प्रशांत राऊत यांनी उपस्थित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे  स्वागत केले.

त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई या संस्थेची आतापर्यंतची यशस्वी वाटचाल, तसेच महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी, शिक्षण व सहशैक्षणिक, आरोग्य, शेती, पर्यावरण, क्रीडा, कला, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात संस्था राबवित असलेले विविध कार्यक्रम व उपक्रम यासंबंधीची माहिती दिली. संस्थेच्या भविष्यात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनाची माहिती विशद केली.

संगमेश्वर तालुक्यातील शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप शैलेश कदम, अभिजित कदम, यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. फुणगूस हायस्कुलचे शिक्षक सुरेश रणदिवे  व दाभोळे हायस्कुलचे शिक्षक मनोज कनावजे यांनी सदर साहित्य शाळांना कसे उपयुक्त असून, त्याचा शाळांना कसा फायदा होणार आहे हे सांगून एस. आय. ग्रुप ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नवी मुंबई आणि सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांचे आभार व्यक्त केले.

संगमेश्वर तालुक्यातील १० शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये शाळांमध्ये आंगवली हायस्कूल, तुळसणी हायस्कूल, कोसुंब हायस्कूल, कळंबस्ते हायस्कूल, दाभोळे हायस्कूल, फुणगुस हायस्कूल, सोनवडे हायस्कूल, कोंडगाव हायस्कूल, ताम्हाणे हायस्कूल आणि केंद्र शाळा मारळ यांचा समावेश आहे. कार्यक्रमातआभार प्रदर्शन कोसुंब प्रशालेचे शिक्षक देवीदास कुळये यांनी व्यक्त केले.

Total Visitor Counter

3379131
Share This Article