साखरपा बस स्थानकातील वजन काटा पडलाय धुळखात

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रमेश शिंदे / भडकंबा: संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी – नागपूर महामार्गाजवळ असणाऱ्या महत्वाच्या व मध्यवर्ती असणाऱ्या साखरपा बस स्थानकावर अनेक वर्षे सेवा देणारा वजन काटा बसस्थानकाच्या इमारतीच्या पाठीमागे धूळ खात असून सध्या त्याची अवस्था ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे. अनेक वर्षे प्रवाशांच्या सामानाचे वजन करून वाहकाला त्याचे तिकीट (लगेज )देण्यास सुलभ पडत होते. मात्र तोच वजन काटा काळाच्या ओघात व बस स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे धूळ खात आहे.एसटी प्रशासनाने याची दखल घेऊन हा अमूल्य ठेवा सुरक्षित ठेवील का, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *