GRAMIN SEARCH BANNER

देवरुखातील राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत कुडाळचा केदार टेमकर प्रथम, इंधन टंचाईवर वेधले लक्ष

जिजाऊ संस्थेच्या रांगोळी स्पर्धेला कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिकंदर फरास / दाभोळे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (केंद्र – संगमेश्वर, देवरुख) यांच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात पार पडली. या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत सिंधुदुर्ग कुडाळ येथील केदार सखाराम टेमकर याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने युद्धाच्या  झाडांमध्ये होरपळणारी यंत्रणा आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर वास्तवता दर्शवणारी रांगोळी रेखाटली होती. या अप्रतिम रांगोळीने साऱ्यांची मने जिंकली. या रांगोळीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून केदार याला 10 हजार रुपये व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

संस्थापक  निलेश भाऊसाहेब सांबरे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेला राज्यभरातून रांगोळी कलाकारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध रंगसंगती, सर्जनशीलता आणि सामाजिक संदेशांनी सजलेल्या रांगोळ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी तसेच कला रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती. स्पर्धकांनी आपल्या कलाकृतींमधून कौशल्यपूर्ण सादरीकरण करत स्पर्धेची शोभा अधिकच वाढवली.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. आयोजकांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून उपस्थितांकडून या स्पर्धेचे विशेष कौतुक करण्यात आले.

Total Visitor Counter

3485054
Share This Article