रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभाग सेवानिवृत्तांचा 18 एप्रिलला स्नेहमेळावा

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी: सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तिसरा स्नेहमेळावा येथील हॉटेल सावंत पॅलेसमध्ये शनिवार, १८ एप्रिल रोजी होणार आहे.

दिवसभराचा हा मेळावा सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 या वेळेत होणार आहे.मेळाव्याला सार्वजनिक बांधकाम विभागातील सचिवांपासून वर्ग ४ पर्यंतचे संपूर्ण देशभर स्थायिक झालेले निवृत्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.सन १९८० मध्ये निर्माण झालेल्या रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे प्रथम अधीक्षक अभियंता आणि निवृत्त सचिव श. रा. तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्नेहमेळाव्याचा प्रारंभ होईल. मेळाव्याला उपस्थित राहू इच्छिणारे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्नेहमेळावा संयोजन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन सुभाष थरवळ यांनी केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *