संगमेश्वरचे सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार संदेश शिवलकर यांचे हृदयविकाराने निधन

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

संगमेश्वर: तालुक्यातील नावडी गावचे सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार आणि माजी उपसरपंच संदेश मनोहर शिवलकर यांचे बुरंबी-तेरे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संगमेश्वर तालुक्यासह कला आणि क्रीडा क्षेत्रात मोठी शोककळा पसरली असून एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

संदेश शिवलकर यांनी केवळ एक कुशल मूर्तिकार म्हणूनच नव्हे, तर सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मूर्तिकलेचा वारसा जपत असतानाच त्यांनी नावडी गावचे उपसरपंच म्हणून काम पाहिले होते, जिथे त्यांनी अनेक विकासकामांत सहभाग नोंदवला. याशिवाय संगमेश्वर तालुक्यात एक उत्तम खेळाडू आणि निष्णात पंच म्हणूनही त्यांची मोठी ख्याती होती. त्यांच्या मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन भाऊ, वहिनी आणि पुतणे असा मोठा परिवार आहे. शिवलकर यांच्या निधनाने संगमेश्वर तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *