GRAMIN SEARCH BANNER

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संकेत कदम यांचा सहकाऱ्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश

भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले स्वागत

रत्नागिरी : भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संकेत कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी (ता. 16) सायंकाळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटीव्ह येथे हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. भाजपचे नेते यांच्या हस्ते संकेत कदम यांचा पक्ष प्रवेश झाला. त्यानंतर संकेत कदम यांच्या सहकाऱ्यांनी प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये शुभम धामणस्कर, विक्रांत वाडकर, अवधूत लिंगायत, संगम पाथरे, पुरुषोत्तम शेळके, आर्यन नारकर, अभय आंब्रे, यश शितोळे, अमरदीप जवळे, नौशाद सावंत, देवेंद्र साळवी गणेश आवले, राहुल पट्टनकुडे, रोहित ओसवाल, मिहीर दळवी, सतीश कामेरकर, अभय आंब्रे, अक्षय जाधव, मंगेश आंब्रे, राज भोसले, सुरज सनगरे, अनिकेत सावंत, स्वप्नील गर्डी, उल्का मुरकर, सविता कदम, मनिषा गुरव, अर्पिता सुर्वे, अर्पिता चौधरी, सुनीता सावंत, नूतन गोरीवले यांचा समावेश आहे. यावेळी तिला आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3485937
Share This Article