मुंबई:- राज्यात सर्वत्र आज विजयादशमीचा सण साजरा केला जात आहे. संपूर्ण राज्यातील वातावरण पूर्णपणे आनंदी आहे.
नवरात्रीच्या शेवटच्या दिवसांत पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आज देखील विजयादशमीच्या दिवशी राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोकण, मुंबईसह तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात आज हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाने 16 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 10 राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये आज 12 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आज या राज्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, गोवा आणि गुजरात भागात उद्या 13 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये आज 12 ऑक्टोबर रोजी आणि उद्या 13 ऑक्टोबर पावसाची शक्यता आहे.
कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.