GRAMIN SEARCH BANNER

मुंबईसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आज पाऊस झोडपणार! IMD चा इशारा, यलो अलर्ट जारी

Gramin Search
63 Views

परतीच्या पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

त्यानुसार, आज मुंबईसह राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, पावसाची ही शक्यता लक्षात घेता IMD कडून या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यातील ‘या’ भागात आज मुसाळधार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढचे काही दिवस परतीच्या पावसाचा जोर कायम राहणार आहे. या काळात काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. पावसाचा हा अंदाज लक्षात घेता या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुण्यात आकाश ढगाळ राहत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

तर उद्या म्हणजेच रविवारी कोकण, मध्यम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

मुंबईतील दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट असल्याने मेळावा कसा पार पडणार याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणच्या दसरा मेळाव्याबाबत देखील हीच परिस्थिती आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरचा शिवसेना मेळाव्या व्यतिरिक्त मराठवाड्यात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा दसरा मेळावा, मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता मेळावा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील नागपूरमध्ये विजयादशमी मेळाव्यास संबोधित करतील. मात्र या सर्व मेळाव्यांवर पावसाचं सावट आहे.

Total Visitor Counter

2649063
Share This Article