देवरूखमध्ये गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

देवरूख: देवरूख येथे अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. देवरूख चर्मालय स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. फैजान फैरोज धामसकर (वय २१ वर्ष, रा. फणसट मुस्लिमवाडी, ता. संगमेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत देवरूख पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:१० वाजण्याच्या सुमारास चर्मालय स्मशानभूमीकडे जाणाऱ्या शांत परिसरात एक तरुण संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. देवरूख पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सचिन गोविंद लगारे आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी फैजान हा सिगारेटच्या माध्यमातून गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळून आले. बेकायदेशीरपणे अमली पदार्थाचा नशा करताना सापडल्याने पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन लगारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. कायदा १९८५ च्या कलम ८(क) आणि २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री १०:०३ वाजता अधिकृतपणे नोंदवण्यात आली. अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरुद्ध पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे व्यसन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जात असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *