आबलोली (वार्ताहर) : जंगल मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वन्य प्राणी मानव वस्तीकडे येऊ लागले आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये आणि शाळकरी मुलांमध्ये प्रचंड घबराट उडाली असून सर्वजण भीतीच्या वातावरणात आहेत. असा प्रकार नुकताच गुहागर तालुक्यातील खोडदे देऊळवाडी, खापलेवाडी, डिंगणकरवाडी रस्त्यावरील कातळांबा जवळ रात्री ८ वाजता ब्लॅक पॅंथरचे दर्शन झाल्याने प्रचंड घबराट उडाली असून वन खात्याने ब्लॅक पँथरचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वन्य प्राणी मानव वस्तीकडे येऊ लागल्याने जीवित हानी होऊ शकते. याकडे वन विभागाने त्वरित लक्ष देऊन ताबडतोब ब्लॅक पँथरचा बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. तसेच भीती आणि घबराट ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. सहा महिन्याच्या कालावधी झाला असेल. खोडदे येथील प्रगतशील शेतकरी रमाकांत साळवी यांच्या चिरेबंदी वाड्याचा दरवाजा तोडून वाड्यात घुसून वाघाने वासराला मारले होते. तरी वन खात्याने ब्लॅक पँथरचा ताबडतोब बंदोबस्त करावा तसेच वन खात्याने मोठ्या प्रमाणात जंगल वाढीसाठी त्वरित नियोजन करावे, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे. ब्लॅक पँथर बद्दलची माहिती सर्वेश साळवी यांनी वन विभागाला दिली आहे. तसेच ब्लॅक पँथर चित्रीकरण भुषण पवार यांनी केले.
गुहागर तालुक्यातील खोडदे येथे ब्लॅक पँथरचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये घबराट







