GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातून दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील फ्री पार्किंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतून एक महागडी दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमरदीपसिंग सतनाम सोखी (वय ३३, रा. भोके, रत्नागिरी) यांचा दुचाकी भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी आपली ८५ हजार रुपये किमतीची मॅट स्टेलर निळ्या रंगाची सुझुकी ॲक्सेस १२५ (क्रमांक एमएच ०८ बीएल २५०७) ही मोटार सायकल १ मार्च २०२६ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या जागेत पार्क केली होती. त्यानंतर १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने ही दुचाकी चोरून नेली.

या चोरीबाबत फिर्यादी यांनी २१ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रीतसर तक्रार दिली आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीचा चेसीस नंबर AF26647662 आणि इंजिन नंबर MB8EN11AAT8884361 असा आहे. रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या परिसरातून दुचाकी चोरीला गेल्यामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3311973
Share This Article