GRAMIN SEARCH BANNER

खरात प्रकरणाचा तपास पेढे आणि पाणीभोवतीच फिरत आहे – वकिलांचा न्यायालयात आक्षेप

Gramin Varta
63 Views

नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात अजूनही विशेष तपासणी पथकाला पाहिजे तसे यश मिळत नसल्याने आरोपीचे वकीलानी आज विरोध करताना सांगितले की पाहिजे त्या प्रमाणात माहिती देऊनही विनाकारण अशोक खरात यांना पोलीस कोठडीची मागणी करणे योग्य नाही असे मत न्यायालयात व्यक्त केले आहे तरी देखील न्यायालयाने सहाव्या गुन्ह्यांमध्ये सोमवार पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

दरम्यान या प्रकरणांमध्ये शहरातील हनी ट्रॅप प्रकरणात असलेल्या हॉटेल व्यवसायिकाला चौकशीसाठी बोलविल्याने पुन्हा हनी ट्रप प्रकरण उघड होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर अजून पर्यंत एस आय टी कडून कोणताही निर्णय घेतला गेला नसल्याचे सांगितले जात आहे.

मागील महिन्यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या वतीने 18 मार्च रोजी शहरात भोंदू बाबा म्हणून कार्यरत असलेल्या आणि दैवी शक्ती आहे असे सांगून अनेक सुशिक्षित आणि उच्चभ्रू महिलांना आपली शिकार बनवणाऱ्या अशोक खरात याच्या विरोधात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मुदगल, व त्यांच्या पथकाने कारवाई केली होती अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे अनेक राजकीय आणि सामाजिक तसेच विविध व्यवसायिक नागरिकांशी असलेले संबंध समोर आलेले होते त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी पुढे कारवाई करू नये म्हणून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर ती दबाव येत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून महिला आयपीएस अधिकारी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापना केली होती. तोपर्यंत नऊ गुन्हे हे नाशिक पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले होते.

आतापर्यंत नासिक मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या एसआयटी पथकाने 5 गुन्हाचा तपास पूर्ण केलेला आहे. सहाव्या गुन्हासाठी शनिवारी अशोक खरात याला न्यायालयात हजर केले असता सोमवारी 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सोनवण्यात आलेली आहे. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास अधिक वेगाने सुरू करण्यात येणार आहे. हे सर्व करत असताना सरकारी वकिलांनी सहाव्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मागताना अजूनही खरात कडून काही माहिती घ्यावयाची आहे जसे की कोणत्या प्रकारचे पाणी आणि कोणत्या प्रकारचे पेढे हे खरात खायला देत होता आणि त्यातून पुढे होणाऱ्या प्रकरणाबाबत माहिती घ्यावयाची असल्याने पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली त्याला आरोपीच्या वतीने म्हणजेच खरात च्या वकिलाने तीव्र विरोध केला.

यावेळी युक्तीवाद करताना खरातचे वकील म्हणाले की आत्तापर्यंत विशेष पोलीस तपास पथकाला पेढे आणि पाणी याशिवाय पुढे जाता आलेले नाही आत्तापर्यंत जो तपास केलेला आहे तो फक्त यावरच फिरत असल्याचे सांगून पोलीस कोठडीला त्यांनी विरोध केला यावेळी आरोपीचे वकील म्हणजेच खरात यांच्या वकील यांनी न्यायालयात सांगितले की वारंवार माहिती देऊनही त्या माहितीतून कोणत्याही प्रकारचे समाधान हे तपास पथकाचे होत नसल्याने आरोपीला आता पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी केली परंतु तपास पथकाचे अधिकाऱ्यांनी यावेळी न्यायालयात प्रत्येक प्रकरणात वेगवेगळे फिर्यादी असल्याने तपास करावाच लागेल असे सांगितल्याने न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे परंतु खरात त्यांच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे एसआयटी पथकाच्या माध्यमातून होत असलेल्या तपासावरती काहीसे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.

या सर्व प्रकरणाचा तपास करत असताना हॉटेल व्यवसायिक ही विशेष तपास पथकाच्या रडार वरती आले यामध्ये मागील काही महिन्यांपूर्वी संपत गेलेले प्रकरण म्हणून शहरातील हनी ट्रॅप पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आले त्या प्रकरणातील हॉटेल व्यवसायिकाची चौकशी करण्यात आली त्यामुळे आता हनी ट्रॅप प्रकरणाचा तपासही एसटी मार्फत केला जाणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे पण याबाबत कोणताही निर्णय झाला नाही असे विशेष पथकाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे जर आदेश मिळाला तर याही प्रकरणाचा तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3322879
Share This Article