रत्नागिरी: भाजप महिला मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष भाजपा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी चरवेली (ता. रत्नागिरी) ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्मिता लेले यांचा सन्मान करण्यात आला.
चरवेली ग्रामपंचायतीत सरपंचपदी सौ. स्मिता लेले यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे तसेच सरचिटणीस संदीप सुर्वे यांनी स्मिता लेले यांच्या घरी जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
स्मिता लेले पूर्वी शिक्षिका होत्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव, सामाजिक जाणीव आणि प्रामाणिक कार्यपद्धती लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत सरपंचपदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे.
निवडीनंतर बोलताना स्मिता लेले यांनी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निःस्वार्थपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.





