अध्यक्ष पदी विनायक सक्रे यांची बिनविरोध निवड
तुषार पाचलकर/राजापूर : पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल संचलित सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल येथे शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मधील पहिल्या शिक्षक पालक संघाच्या सभेचे शनिवार दि.२६ जुलै २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.तानाजी देसाई यांनी सभेचे प्रास्ताविक केले.
यावेळी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच एन.एम.एम.एस. परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व २०२६-२७ साठी शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावी तुकडीनिहाय पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
अध्यक्ष म्हणून पालक श्री.विनायक सक्रे यांची तर श्रीमती ज्योती कोकरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सभेमध्ये संस्थेचे सचिव श्री.रामचंद्र वरेकर तसेच सहसचिव श्री. किशोरभाई नारकर यांनी आपले विचारव्यक्त केले. कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.अशोक गंगाराम सक्रे, सचिव श्री. रामचंद्र वरेकर,सहसचिव श्री.किशोरभाई नारकर, श्री.राजन लब्दे, श्री.शंकर पाथरे,श्री.विकास कोलते, श्री.सिद्धार्थ जाधव तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. समारोप श्रीमती मोरे मॅडम यांनी केला.सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.