रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगाल, आसाम आणि पौंडिचेरी येथील निवडणुकांत मिळालेल्या दणदणीत विजयाचा आनंद रत्नागिरीत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. शहरातील मारुती मंदिर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी लाडू वाटून ढोल-ताशांच्या गजरात विजयी जल्लोष करत वातावरण दणाणून सोडले.
‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘नरेंद्रजी मोदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’, ‘अमितजी शाह आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’ तसेच ‘जय जय श्रीराम’ अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.
या जल्लोषात भाजपा जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेवक राजू तोडणकर, नगरसेवक नितीन जाधव, स्वीकृत नगरसेवक संदीप सुर्वे, जिल्हा चिटणीस राजन पटवर्धन, जिल्हा सदस्य शेखर लेले, शैलेश बेर्डे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे आणि बहुसंख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.






