GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून वृद्धाची गळफास लावून आत्महत्या

Gramin Varta
42 Views

चिपळूण: तालुक्यातील खरवते बौद्धवाडी येथे एका ६२ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शारीरिक व्याधीला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अनिल गोविंद पवार असे मृत वृद्धाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पवार हे गेल्या दोन वर्षांपासून गुडघेदुखीच्या तीव्र आजाराने त्रस्त होते. या आजारपणामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक वेदना होत होत्या. याच त्रासाला कंटाळून १३ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून घेतला. ही घटना लक्षात येताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू केला आहे. एका वृद्ध व्यक्तीने आजारपणाला कंटाळून अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने खरवते परिसरात शोककळा पसरली आहे.

Total Visitor Counter

3386540
Share This Article