GRAMIN SEARCH BANNER

अशोक खरात आणि त्यांच्या पतसंस्थेशी कोणताही आर्थिक व्यवहार नाही – रुपाली चाकणकर

Gramin Varta
3 Views

मुंबई: समता पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची सुमारे आठ तास चौकशी केली. या चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चाकणकर यांनी त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले.

अशोक खरात किंवा संबंधित पतसंस्थेशी आपला कोणताही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावे असलेल्या बँक खात्यांबाबत विचारले असता रुपाली चाकणकर म्हणाल्या, मी यापूर्वी सुद्धा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं आणि आज देखील आवर्जून सांगते की, समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्या नावाने जी खाती उघडली गेली, ती पूर्णपणे बनावट आहेत. दोघे कधीही समता पतसंस्थेत गेली नव्हती, त्यांना ती संस्था कुठे आहे हे देखील ठाऊक नाही. त्या खात्यांचे ओटीपी थेट अशोक खरातकडे जात होते. त्या ठिकाणी या दोघांच्याही सह्या नव्हत्या. केवळ या दोघांचीच नाही, तर माझ्या माहितीनुसार सव्वाशे ते दीडशे लोकांची अशी बनावट खाती उघडण्यात आली आहेत. ज्या व्यक्तींना घरातून चालताही येत नाही, अशांच्या नावावरही खाती काढली गेली आहेत, असे चाकणकरांनी सांगितले.

अशोक खरात सोबतच्या गुवाहाटी येथील हॉटेल ‘ब्ल्यू रेडिसन’मधील फोटोंवर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, गुवाहाटीचा जो फोटो समोर आला आहे, त्यामध्ये माझ्या कुटुंबासोबत खरातचे कुटुंब आहे. आम्ही त्यांच्यासोबत प्रवास केलेला नाही. दर्शनासाठी आम्ही पुण्यातून स्वतंत्रपणे गेलो होतो.

Total Visitor Counter

3386401
Share This Article