GRAMIN SEARCH BANNER

लांजा महाविद्यालय  कला शाखेच्या इंग्रजी विभागात अझमीना अल्लाउद्दीन नेवरेकर प्रथम

Gramin Varta
325 Views

लांजा / अरबाज नेवरेकर :  न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजा संचलित लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कला शाखेच्या इंग्रजी विभागात अझमीना अलाउद्दीन नेवरेकर हिने उल्लेखनीय यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने ६०० गुणांपैकी ३९१ गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अझमीना ही अभ्यासाबरोबरच विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असते. मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवात मेहंदी डिझायनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत तिने आपल्या कलागुणांचीही चमक दाखवली होती. शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत तिने विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

तिच्या सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. अझमीना हिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच कुटुंबीय यांच कडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3416561
Share This Article