चिपळूण/दिपक कारकर :सह्याद्री समाचार वर्धापनदिन निमित्त
सह्याद्री समाचार आणि कोकण मराठी साहित्य परिषदआयोजित पुरस्कार वितरण सोहळा व निमंत्रितांचे कविसंमेलन रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४.०० वा.आयोजित करण्यात आले आहे.याप्रसंगी विविध क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तीमत्वांना तसेच सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांना सह्याद्री समाचारच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच काव्यसंमेलनाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कवींना कविता सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून शेखर निकम सर (आमदार चिपळूण संगमेश्वर विधानसभा) विनय नातू साहेब(माजी आमदार),प्रशांत यादव साहेब (सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार ),सदानंद चव्हाण साहेब (माजी आमदार),प्रमोद गांधी साहेब (मनसे गुहागर संपर्क अध्यक्ष),विशाल भोसले साहेब (मुख्याधिकारी चिपळूण नगरपरिषद),चंद्रकांत भोजने साहेब (प्रसिद्ध उद्योजक),गुलाबराव राजे सर (निवृत्त प्राध्यापक,संविधान सन्मान समिती प्रमुख),रवींद्र मटकर साहेब (अध्यक्ष नमन लोककला संस्था),दिनेशदादा कुरतडकर साहेब(संस्थापक कोकण कलामंच),नाझिमभाई आफवारे (कार्याध्यक्ष चिपळूण मुस्लिम समाज),राजेंद्रकुमार राजमाने साहेब (उपविभागीय पोलिस अधिकारी),अनंतराव पालांडे साहेब (अध्यक्ष पंधरा विभाग माध्यमिक शिक्षण संस्था)प्रा. डॉ.बाळासाहेब लबडे (ज्येष्ठ साहित्यिक),सतीश कदम (संपादक,कोकण एक्सप्रेस) श्री.रऊफभाई वांगडे (अध्यक्ष महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण) यासिनभाई दळवी (ज्येष्ठ समाजसेवक) उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम लोकमान्य टिळक वाचनालयाचे बाळशास्त्री जांभेकर सभागृह, जुना भैरी मंदिर समोर,चिपळूण येथे संपन्न होणार आहे. यात विविध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पुरस्कार प्राप्त मान्यवर खालीलप्रमाणे –
१) सह्याद्री साहित्यप्रेमी पुरस्कार-
मा. श्री. मोहम्मद हुसैन मुसा (चिपळूण)
२) सह्याद्री आदर्श पत्रकार पुरस्कार-
मा. श्री. नागेश पाटील (दैनिक सकाळ,चिपळूण)
३) सह्याद्री आदर्श पत्रकार पुरस्कार-
श्री. दीपक कारकर(मुर्तवडे,तालुका चिपळूण)
४) सह्याद्री गीतरत्न पुरस्कार-
श्री.गोपाळ कारंडे(संगमेश्वर)
५) सह्याद्री बालगंधर्व पुरस्कार-
श्री. युवराज जोशी(रत्नागिरी)
६) सह्याद्री लोककला रत्न पुरस्कार-
श्री. सतीश जोशी(रत्नागिरी)
७) सह्याद्री समाजरत्न पुरस्कार-
श्री. इब्राहिम वांगडे(चिपळूण)
८) सह्याद्री नारीशक्ती पुरस्कार-
सौ. स्वप्ना प्रशांत यादव(चिपळूण)
९) सह्याद्री नारीशक्ती पुरस्कार-
डॉ. मनिषा वाघमारे(चिपळूण)
१०) सह्याद्री कीर्तनकार पुरस्कार-
श्री. ह.भ.प निलेश पवार(चिपळूण)
११) सह्याद्री काव्यसंग्रह पुरस्कार-
अल्लाह ईश्वर (कवी – सफरअली इसफ)(वैभववाडी)
१२) सह्याद्री बाल कलारत्न पुरस्कार-
कुमार चैतन्य अरविंद जोगले(चिपळूण)
१३) महेशकुमार स्मृती पुरस्कार-
श्री. राजेश गोसावी (लांजा)
१४)सह्याद्री साहित्य समीक्षा पुरस्कार- श्री संजय बोरुडे(अहमदनगर)
याप्रसंगी निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न होणार आहे.
कविसंमेलन अध्यक्ष भालचंद्र सुपेकर (कवी, लेखक, सरकारी वकील)
यात सहभागी कवी पुढील प्रमाणे आहेत.
सौ.दिपाली महाडिक,खेड
श्री. प्रतीक कळंबटे, नरबे, गणपतीपुळे
श्री. संदेश सावंत, सावर्डे
सौ. माधुरी खांडेकर, चिपळूण
श्री. सफरअली इसफ, राजापूर
श्री. ओंकार गुरव, गुहागर
श्री. दादासाहेब शेख, खेड
श्री. जमालुद्दीन बंदरकर, चिपळूण
श्री. संदेश पवार, चिपळूण
श्री. संदीप येल्ये, सावर्डे
श्री. संजय कदम, चिपळूण
श्री. प्रदीप मोहिते, ओमळी
श्री. जयंत चव्हाण, दापोली
कु.सिद्धी चाळके,खेड
त्यानंतर कु.समायरा शाहिद खेरटकर हिचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.
सर्व साहित्यप्रेमी तसेच समस्त नागरिकांना उपस्थित राहण्याची विनंती सह्याद्री समाचारचे संपादक / निवेदक / शाहीर तसेच कोकण मराठी साहित्य परिषद शाखा गुहागरचे अध्यक्ष शाहिद खेरटकर यांनी केली आहे.