GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणचे उद्योजक प्रशांत पाटेकर यांची श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल डेव्हलपमेंट कमिटीवर निवड

Gramin Varta
70 Views

चिपळूण : शहरातील नावाजलेल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या स्कूल डेव्हलपमेंट कमिटीच्या सदस्यपदी प्रथितयश बांधकाम व्यावसायिक, ‘आपलं चिपळूण’ संस्थेचे उपाध्यक्ष आणि अपरान्त हॉस्पिटलचे संचालक श्री. प्रशांत पाटेकर यांची सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. प्रशांत देवळेकर आणि संचालक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन श्री. पाटेकर यांचे विशेष स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त सुप्रसिद्ध डॉ. यतिन जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, श्रीराम एज्युकेशन सोसायटी ही सर्वसामान्य जनतेची संस्था असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या अंतर्गत शिशुविहार, सौ. अपर्णाताई मेहंदळे प्राथमिक शाळा, परांजपे मोतिवाले हायस्कूल आणि आनंदराव पवार महाविद्यालय यशस्वीपणे चालवले जाते. संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत देवळेकर यांनी सांगितले की, श्री. प्रशांत पाटेकर यांच्यासारख्या मान्यवर व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा संस्थेला लाभ होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. श्री. पाटेकर यांच्या व्यवसायाची व्याप्ती नवी मुंबई, मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत असून, विधानभवन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा मान्यवर संस्थांबरोबरील विविध कामांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनाही नेहमीच सहकार्य केले आहे.

स्वतःचा व्यवसाय सांभाळत समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत ते सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. ‘आपलं चिपळूण’ या समाजोपयोगी संस्थेच्या माध्यमातून कार्य करताना त्यांचे चिपळूणवरील प्रेम आणि शहराच्या विकासाविषयीची तळमळ सातत्याने दिसून आली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या अष्टपैलू अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ संस्थेला तसेच विद्यार्थ्यांना निश्चितच होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना श्री. प्रशांत पाटेकर यांनी, संस्थेशी आपले जिव्हाळ्याचे नाते असून संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि विकासासाठी भरीव योगदान देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. मल्लेश लकेश्री, कोषाध्यक्ष श्री. सिद्धेश लाड, बांधकाम कमिटी अध्यक्ष श्री. सुहास चव्हाण, श्रीराम एज्युकेशन सोसायटी व खरेदी विक्री संघ चिपळूणचे संचालक श्री. विलास चिपळूणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Total Visitor Counter

3483539
Share This Article