GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात भंगार दुकान फोडण्याचा प्रयत्न; दोघांविरोधात गुन्हा

Gramin Search
23 Views

राजापूर : तालुक्यातील बंगलवाडी येथे भंगाराच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना मंगळवारी, १७ जून रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली. या प्रकरणी दोन आरोपींविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत दत्ताराम मस्ये आणि अमर नारायण चिपटे (दोघेही रा. बंगलवाडी, राजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन हुसेनी वाघमारे (वय ४८, रा. बंगलवाडी, राजापूर) यांचे बंगलवाडी येथे भंगाराचे दुकान आहे. मंगळवारी सकाळी त्यांच्या दुकानाचे पत्रे काढून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर मल्लिकार्जुन वाघमारे यांनी तातडीने राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याबाबत तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अनंत मस्ये आणि अमर चिपटे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Total Visitor Counter

3376010
Share This Article