रायपाटण केंद्रशाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Gramin Varta
184 Views

रायपाटण / नितीश खानविलकर: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद केंद्र शाळा रायपाटण क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. राजापूर तालुका विकास युवा संघाचे अध्यक्ष मधुकर गोमणे यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.

सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राजापूर तालुका विकास युवा संघाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुकर गोमणे यांनी विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमास शांताराम रोगे, रायपाटणचे माजी सरपंच संदीप कोलते, सुदेश कोलते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर गुरव, विनायक निखार्गे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली धावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. माने यांनी केले.

या उपक्रमास ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Total Visitors :
4820800
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *