चिपळूण: परिसरातील वेगवेगळ्या विभागातील योग्य व्यक्तीचा नमो सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे चिपळूण शहर मंडलातर्फे जागतिक योग दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘नमो सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ हॉल येथे हा समारंभ पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७५ व्यक्तींना ‘नमो सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मार्गदर्शन केले. डॉ. नातू म्हणाले, सत्कार सोहळ्याला असणारी गर्दी पाहता हा सोहळा भाजपला चिपळुणात एक वेगळी ओळख देणारी ठरणार आहे. कार्यकर्त्यांनी आपली ओळख अशाच सोहळ्यातून निर्माण करणे गरजेचे आहे. योगाला जागतिक स्तरावर भाजपने वेगळी ओळख निर्माण केली आणि आता खेडोपाडीही योगाचे शिक्षक आहेत, हेच या दिवसाचे महत्त्व आहे.
चिपळूणमधील ७५ मान्यवरांना ‘नमो सन्मान’
