GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा हेमलताताई बुरटे यांच्यासाठी धावून आले ओ निगेटिव्ह रक्तदाते

Gramin Search
7 Views

ब्लड लाईन ग्रुपचा सेवाभावी, हृदयस्पर्शी मदतीचा हात!

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा हेमलताताई बुरटे सध्या रत्नागिरीतील ‘परकार हॉस्पिटल’मध्ये उपचार घेत आहेत. उपचारांच्या दरम्यान त्यांना ओ निगेटिव्ह या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाच्या चार बॅग्सची तातडीने गरज भासली. ही बाब लक्षात येताच ब्लड लाईन ग्रुप – चिपळूण या सेवाभावी संस्थेचे चार जण तत्काळ मदतीला धावले आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण साऱ्यांसमोर ठेवले.

या संकटसमयी कृष्णा अँटिऑक्सिडंट कंपनीचे व्यवस्थापक (एचआर) सुयोग चव्हाण यांनी सोळाव्या वेळेस रक्तदान करत पुढाकार घेतला. त्यांच्यासोबत समाधान मुळे यांनी आपली ५२वी वेळ गाठत या सेवेतली निष्ठा अधोरेखित केली. तसेच पंकज आवले आणि भावीन कटारिया या दोघांनीही रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली.

डेरवण येथील भक्तश्रेष्ठ वालावलकर रुग्णालयात हे चारही रक्तदाते प्रत्यक्ष जाऊन हेमलताताईंना जीवनदायी मदत केली. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

या उदात्त कार्यातून “रक्तदान हेच खरे जीवनदान” हे विधान पुन्हा एकदा सत्य ठरले आहे. ब्लड लाईन ग्रुपच्या वेळेवर आणि तत्पर योगदानामुळे हेमलताताईंवर वेळेत उपचार होऊ शकले, ही एक दिलासादायक बाब आहे.

Total Visitor Counter

2647023
Share This Article