न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल आंबेड बुद्रुकचा दहावीचा निकाल शंभर टक्के; गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

Gramin Varta
541 Views

संगमेश्वर: आंबेड बुद्रुक येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलने इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या या उत्तुंग यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या ध्येयाने काम करणाऱ्या या शाळेने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप पाडली आहे.
यावेळी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी अमान आंबेडकर, असजद सय्यद आणि रुद्र नागवेकर यांचा त्यांच्या पालकांसह गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाले, असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले. शाळेच्या शिक्षकांनी वर्षभर केलेल्या नियोजनामुळे आणि विद्यार्थ्यांकडे दिलेल्या वैयक्तिक लक्षामुळे हे यश मिळाल्याचे विद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. या निकालामुळे शाळेचे नाव शैक्षणिक क्षेत्रात अधिक उज्ज्वल झाले असून, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या सोहळ्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, संगमेश्वर सभापती शर्वरी वेल्ये, रत्नागिरी सभापती प्रवीण पांचाळ, जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, उद्योजक सिद्धेश ब्रीद यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, उपाध्यक्ष सलाउद्दीन बोट, वासुदेव लिंगायत, सचिव राजेश आंबेकर, खजिनदार नाझीमा बांगी तसेच शाळेचे शिक्षक, कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -
Total Visitors :
4828000
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *