रत्नागिरी: हरचेरी-कुंभारवाडी येथे साफसफाई करताना माळ्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
79 Views
Cropped shot of the feet of an unrecognizable male corpse lying on a hospital bed

रत्नागिरी : घराची साफसफाई करत असताना माळ्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना हरचेरी-कुंभारवाडी येथे घडली.

सुभाष गणपत साळवी (वय ७०, रा. हरचेरी-कुंभारवाडी, ता. जि. रत्नागिरी) हे ५ सप्टेंबर रोजी घराची साफसफाई करीत होते. यावेळी माळ्यावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या नाकातून रक्तस्राव होऊन ते बेशुद्ध पडले. त्यानंतर घरातील सदस्य तसेच शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

साळवी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, उपचारादरम्यान ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.५१ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत त्यांची मुलगी प्रिती मंदार आष्टेकर यांनी पोलिसांना खबर दिली. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

Total Visitors :
4819442
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *