गुहागर तालुका युवासेना अधिकारी इम्रान घारे यांचा पदाचा राजीनामा

Gramin Varta
130 Views

गुहागर: उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुहागर तालुका युवासेना अधिकारी इम्रान घारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सोपवला असून, वैयक्तिक व्यवसाय आणि पक्षासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याचे कारण या निर्णयामागे त्यांनी नमूद केले आहे.

इम्रान घारे हे २०२२ पासून युवासेना अधिकारी म्हणून गुहागर तालुक्यात कार्यरत होते आणि त्यांनी युवा संघटना मजबूत करण्यासह आमदार जाधव यांना राजकीय बळ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान असलेले घारे यांनी पदाचा राजीनामा दिला असला तरी, ते यापुढेही पक्षासाठी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे गुहागरच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *