डॉक्टर दिनानिमित्त नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभागातील डॉक्टरांचा सन्मान करून व्यक्त केली कृतज्ञता

Gramin Varta
843 Views

लांजा/ अरबाज नेवरेकर: राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी समाजाप्रती निस्वार्थ भावनेने आरोग्यसेवा देणाऱ्या प्रभागातील डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अशोक पाटील, डॉ. कुणाल जगताप आणि डॉ. अशोक गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. रुग्णसेवा हेच सर्वोच्च मानवसेवेचे कार्य असून, डॉक्टर हे समाजाच्या आरोग्याचे खरे शिल्पकार आहेत. संकटाच्या प्रत्येक क्षणी नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या डॉक्टरांचे योगदान अमूल्य असल्याचे मत नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांनी व्यक्त केले.

“डॉक्टर हे केवळ उपचार करणारे नाहीत, तर अनेकांना नवजीवन देणारे देवदूत आहेत. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही समाजाची नैतिक जबाबदारी आहे,” असेही मायशेट्ये यांनी यावेळी सांगितले.

नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये यांच्या या उपक्रमाचे डॉक्टरांसह नागरिकांनीही स्वागत केले. डॉक्टर दिनानिमित्त व्यक्त करण्यात आलेला हा सन्मान वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी कार्याला मानवंदना देणारा ठरला.

यावेळी सर्व डॉक्टर  यांच्याशी संवाद साधत त्यांच्या दवाखान्यांशी तसेच आरोग्यसेवा देताना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. नगरसेवक या नात्याने या समस्यांच्या निराकरणासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Total Visitors :
4827682
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *