मंडणगड : तालुक्यातील पालवणी गोसावीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या मुसळधार पावसात कोसळली होती. या घटनेला एक महिना उलटून गेला असतानाही भिंतीची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून शाळेची इमारतही धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे.
शाळेच्या पश्चिम बाजूस रस्त्यालगत असलेली सुमारे १४ मीटर लांबीची भिंत कोसळली असून, त्याच दिशेची आणखी १४ मीटर लांबीची भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. कोसळलेल्या दगडांमुळे शाळेच्या इमारतीच्या भिंतीवर ताण आल्याने इमारतीसही धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासन आणि ग्रामस्थांनी मिळून गटशिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी आणि स्थानिक सरपंच यांना ३० नोव्हेंबर २०२४ रोजी लेखी निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र अद्याप कुठलीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
“विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून प्रशासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे,” असे ग्रामस्थांनी सांगितले. पावसाळ्याचे दिवस सुरू असून आणखी नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंडणगडमध्ये शाळेची भिंत कोसळली, निवेदन देऊनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Leave a Comment