रत्नागिरी: शहरानजीकच्या रेल्वे स्टेशन येथील हॉटेल गिरीरत्न येथून
दुचाकी चोरीस गेल्याची घटना 28 जून रोजी दुपारी 02.00 ते 1 जुलै रोजी पहाटे 02.00 च्या दरम्यान घडली. या दुचाकीचा रांग लाल असून हिरो होंडा पॅशन मोटारसायकल (क्र. एम एच 08/एस/0151, किंमत 10,000 रुपये) अशी किंमत आहे. महेंद्र पंढरीनाथ नागवेकर (वय 56, व्यवसाय शेती, रा. घर नं 690, नागवेकरवाडी, सोमेश्वर, ता. जि. रत्नागिरी) यांनी आपली मोटारसायकल उभी केली होती, अज्ञात इसमाने ती चोरून नेली.
याप्रकरणी 1 जुलै 2025 रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरातून दुचाकी चोरीला

Leave a Comment