चिपळूण: तालुक्यातील कापसाळ दुकानखोरी येथे एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील खुंटीला टांगलेल्या पॅन्टच्या खिशातून 350 रुपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी कल्पेश महेश साळवी (वय 25, रा. कापसाळ दुकानखोरी, ता. चिपळूण) यांनी 1 जुलै 2025 रोजी तक्रार दाखल केली आहे. त्या नुसार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
चिपळूण कापसाळमध्ये घरफोडी
