GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: रत्नदुर्गवरून आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांनी केले धक्कादायक आरोप…चिठ्ठीही सापडली…म्हणाली,..

Gramin Search
29 Views

आत्महत्या करायची असते तर नाशिक मध्ये केली असती रत्नागिरीत कशाला आली असती..हरामजादेने मेरी बेटीको..वडिलांचा सवाल

रत्नागिरी: रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात पडून झालेल्या सुखप्रित कौर या तरुणीच्या मृत्यू प्रकरणाला आता एक नवे आणि अंत:करण हेलावून टाकणारे वळण मिळाले आहे. आपल्या लेकीच्या अशा अचानक आणि दु:खद अंतामुळे सुन्न झालेल्या वडिलांनी आज रत्नागिरीत येऊन घटनास्थळाला भेट दिली. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी एकच आर्त सवाल केला,“माझी मुलगी आत्महत्या करणार नव्हती… तिचा घात झाला आहे!”

“नाशिकमध्ये आत्महत्या केली असती, रत्नागिरीला का आली?” – व्यथित वडिलांचा सवाल

सुखप्रितचे वडील प्रकाशसिंह कौर यांनी उपस्थित केलेले प्रश्न प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज अधोरेखित करतात. “जर तिला खरोखर आत्महत्या करायचीच होती, तर ती नाशिकमध्ये केली असती ना? रत्नागिरीला का आली?” असा सवाल त्यांनी अत्यंत व्यथित मनाने केला. सुखप्रित ही नाशिकमधील आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. तिच्या राहत्या ठिकाणी पोलिसांना मिळालेल्या बॅगेत एक चिठ्ठी सापडली त्यात तिने लिहिले आहे की, “मी संकटात अडकले आहे. मी कोणाला सांगू शकत नाही. मी काय करू? मला समजत नाही.”

‘त्या’ तरुणावर संशयाची सुई, वडिलांचा कडवट आणि दुःखद आरोप

ही घटना घडण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, म्हणजे शुक्रवारी, सुखप्रितने आपल्या वडिलांना फोन केला होता. त्यानंतर शनिवारीपासून तिचा फोन पूर्णतः बंद आला.
या संदर्भात बोलताना प्रकाशसिंह कौर यांनी भावनांचा बांध फोडत अत्यंत गंभीर आरोप केला ,“हरामजादेने फोन केला. तोच मुलगा तिला फोन करत होता.”

हे बोलताना त्यांचा स्वर केवळ संतापाचा नव्हता, तर हतबलतेने भरलेला होता.एका वडिलांचा, ज्यांनी आपली मुलगी गमावलेली आहे आणि न्याय मागण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरलेले नाही.

सुखप्रित काही काळापूर्वी मनीपाल कॉलेज, बेंगळूरु येथे बँकेच्या प्रशिक्षणासाठी गेली होती. तिथेच एका तरुणाशी तिची ओळख झाली होती. तिच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या तरुणाने प्रेमाचे खोटे नाटक रचले आणि तिच्या भावनांशी खेळ केला.
याच तरुणाच्या ओळखीमुळे ती नाशिकहून दोन वेळा रत्नागिरीला आली होती, असे तिच्या मैत्रिणीने कुटुंबीयांना सांगितले आहे.

“हरामजादेने मेरी बच्ची का घात किया”

सुखप्रितच्या वडिलांनी रत्नागिरीतील बँकेत काम करणाऱ्या जोशन नायक नावाच्या तरुणाकडे संशय व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं – “ती यापूर्वीही त्याला भेटायला आली असेल. हरामजादेने मेरी बच्ची का घात किया.” ही आरोळी ऐकणाऱ्यालाही अंतर्मनात दुख: झोंबेल इतकी ती वेदनादायी आहे.

या साऱ्या घटनांवरून स्पष्ट होतं की, हा मृत्यू निव्वळ आत्महत्या नसून, त्यामागे काहीतरी गंभीर आणि काळोखात लपलेलं कारण असावं, असा संशय बळावतो आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे आणि लवकरच या दु:खद प्रकरणामागचं सत्य उजेडात येईल, अशी साऱ्यांना आशा आहे.

Total Visitor Counter

2650726
Share This Article