दापोली : तालुक्यातील वडवली आदिवासीवाडी येथे ४ जुलै २०२५ रोजी विहिरीत पडून एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. विठ्ठल निकम (६५, रा. वडवली आदिवासीवाडी, ता. दापोली) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निकम हे रेशनकार्ड व आधारकार्डची झेरॉक्स आणण्यासाठी वडवली गावठाण येथे गेले होते. झेरॉक्स काढण्याऐवजी ते पांढरे यांच्या घराच्या खालच्या बाजूला नैसर्गिक विधीसाठी गेले असता, त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. यात त्यांच्या डोक्याला मार लागला.
या घटनेनंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दापोली पोलिसांनी या घटनेची नोंद अकास्मिक मृत्यू म्हणून केली असून, पुढील तपास सुरू आहे.
दापोलीत विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

Leave a Comment