रत्नागिरी: चिपळूण येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेत अभ्युदयनगर इथल्या ईगल तायक्वांदो सेंटरच्या शिवाज्ञा शुभम पवार हिला रौप्य पदक मिळाले.
दोन ते चार ऑगस्ट या दरम्यान शहानूर चिपळूण तालुका तायक्वांदो अकॅडमी आयोजित रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या संलग्नतेने चिपळूण येथील पुष्कर हॉल येथे जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 14 किलो खालील मुलींच्या पीवी गटात शिवाज्ञा शुभम पवार हिला हे रौप्य पदक मिळालं.
शिवाज्ञा शुभम पवार ही अभ्युदय नगर बहुउद्देशीय सभागृह येथे ईगल तायक्वांदो सेंटरमध्ये या खेळाचं प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक संकेता संदेश सावंत आणि सई संदेश सावंत यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली तिने या स्पर्धेत हे सुयश मिळवले आहे. दामले शाळेची विद्यार्थिनी असलेल्या शिवाज्ञा पवार हीचे या यशाबद्दल चाळकेवाडी, टिके रत्नागिरीचे ग्रामस्थ तसेच शाळा, तायक्वांदो संघटना या सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.