GRAMIN SEARCH BANNER

राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचं को-ऑर्डिनेशन, एकाचवेळी घराबाहेर पाऊल ठेवलं, शिवतीर्थ अन् मातोश्रीवरुन गाड्या रवाना

मुंबई: मराठी अस्मितेसाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू आज विजयी मेळावा घेत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.  या कार्यक्रमासाठी प्रंचड गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. मेळाव्याच्या ठिकाणी मोठ्य प्रमाणावर लोक जमा झाले आहेत. मेळाव्याचे ठिकाणी तुडूंब गर्दी झाली आहे. दोन्ही भाऊ मेळाव्यासाठी एकाच वेळी घराबाहेर पडले आहेत. राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे हे एकाचवेळी घराबाहेर पडले असून ते दोघांच्या गाड्या एकत्र वरळी परिसरात पोहोचल्या आहेत.  राज ठाकरे शिवतीर्थवरून तर उध्दव ठाकरे मातोश्रीवरुन मेळाव्याकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांचा एकत्रच एन्ट्रीचा प्लॅन असल्याच्या चर्चा आता उपस्थितांमध्ये रंगल्या आहेत.

वरळी डोमच्या आतमध्ये प्रंचड गर्दी झाली असून ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र एकवटला आहे. वरळी डोममध्ये मराठी अस्मितेसाठी हाडाचा मराठी माणूस एकत्र आला आहे. आज तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना असल्याचं अनेकांनी बोलताना सांगितलं आहे. तसेच, आज ठाकरे बंधू एकत्र येत नाहीयेत, तर मराठी बाणा एकत्र येतोय, अशीही प्रतिक्रिया जमलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी दिली आहे. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार, स्टेजवर फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बसणार आहेत. तर, इतर सर्व मान्यवर स्टेजखाली पहिल्या ओळीत बसतील, भाषणं फक्त 4 जणं करतील ऐनवेळी एकादा चेहरा वाढेल, अशी माहिती मिळत आहे.

मेळाव्याच्या ठिकाणी तोबा गर्दी
राज-उद्धव ठाकरे एकत्र येतानाचा क्षण अनुभवण्यासाठी मेळाव्याच्या ठिकाणी तोबा गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. या कार्यमासाठी मोठी गर्दी झाली आहे. मेळाव्याच्या एक तासआधी सभा ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. मेळाव्याचं ठिकाण 75 टक्के भरलं आहे. ठिकाणाच्या बाहेर देखील मोठ्या स्क्रिन लावण्यात आलेल्या आहेत. वरळी डोम मेळाव्याच्या तासभर आधीच हाऊसफुल्ल झालं आहे.  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही भाषणं  होणार आहेत, सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे, उद्धव ठाकरे वरळी डोमला पोहोचणार आहेत, यानंतर कार्यक्रम सुरू होणार आहे. सुरूवातीला प्रकाश रेड्डीचं भाषण होईल त्यानंतर शेकापचे जयंत पाटील यांचं भाषण होणार आहे..या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचही भाषण होणार आहे. त्यानंतर राज ठाकरेंचं भाषण होणार असून उद्धव ठाकरेचं भाषण सगळ्यात शेवटी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान काँग्रेस नेते आल्यास त्यांनाही भाषणाची संधी दिली जाणार आहे.

Total Visitor

0217983
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *