राजापूर : जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या सूचनेनुसार राजापूर तालुक्यातील 101 ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे. ही सोडत सोमवार, दि. १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवाजी महाराज नाट्यमंदिर, राजापूर येथे घेण्यात येणार आहे.
सरपंच पदांसाठी जिल्हानिहाय वाटप अधिसूचना दिनांक १३ जून २०२५ रोजी प्राप्त झाली असून, त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
यावेळी सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सुजाण नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती तहसीलदार विकास गबरे यांनी दिली.
राजापूर तालुक्यातील सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत १४ जुलै रोजी
