तुषार पाचलकर / राजापूर
राजापूर तालुका बौद्धजन संघ गट क्र. ३ च्या संस्कार समितीने आयोजित केलेल्या वर्षावास प्रबोधन मालिकेचे पहिले पुष्प आदर्श नगर पांगरी खुर्द येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक मंडळाचे अध्यक्ष आयु. सयाजी जाधव होते.
कार्यक्रमात आयु. नी. प्रज्ञा गौतम पांगरीकर यांनी “वर्षावासाचे महत्त्व आणि आषाढ अर्थात गुरू पौर्णिमेचे महत्त्व” या विषयावर प्रबोधन केले. त्यांनी विषयाचे सखोल विवेचन करत उपस्थितांना चिंतनप्रवण केले. सर्वांनी शांततेने प्रबोधन ऐकून त्याला साधुकार दिला.
गटाचे अध्यक्ष आयु. नरेश पाचलकर यांनी या उपक्रमाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. आदर्श कला निकेतन पांगरी या संस्थेने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
कार्यक्रमास आयु. शिवाजी जाधव, भाऊ जाधव, सुरेश यादव, महेंद्र परूळेकर, हरेश जाधव, राजेंद्र जाधव, सिध्दार्थ कारवेलकर, पाचल मधुन, बौद्धाचार्य प्रमोद जाधव, बी. बी. पाचलकर, सिध्दार्थ पाचलकर, राजरत्न जाधव, प्रज्ञा पांगरीकर, प्रज्ञा जाधव, विशाखा पाचलकर, रविंद्र हरळकर तसेच येरडव महिला मंडळ यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष जाधव यांनी केले.
वर्षावास प्रबोधन मालिकेला आदर्श नगर पांगरी खुर्द येथे उत्स्फूर्त प्रारंभ
