रत्नागिरी: ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय नॅचरल महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत देवरूख येथील टायटन जिमच्या रोहन विद्याधर भालेकर याने दोन गटांमध्ये चमकदार कामगिरी केली.
या स्पर्धा नौपाडा (ठाणे) येथे दोन प्रकारांमध्ये झाल्या. या दोन प्रकारांमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेत सात गटांचा, तर जीन्स मॉडेल स्पर्धेत दोन गटांचा समावेश होता. रोहन भालेकर याने जीन्स मॉडेल स्पर्धेतील दुसऱ्या गटात (२३ ते ३० वर्षापर्यंत) तिसरा क्रमांक, तर शरीरसौष्ठव स्पर्धेतील सातव्या गटात (खुला वर्ग उंची १७० सें. मी. वरील) सहावा क्रमांक मिळविला.
भालेकर याला टायटन जिमचे मालक व व्यवस्थापक सागर संसारे आणि नासिर फुलारी, प्रशिक्षक नंदकिशोर साळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.