GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत घटस्फोटावर पती-पत्नीमध्ये समुपदेशन करताना न्यायाधीशांसमोरच तरुणाचा दारुच्या नशेत धिंगाणा

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या चेंबरमध्ये एका तरुणाने दारुच्या नशेत धिंगाणा घातल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी (14 जुलै 2025) दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. दशरथ हिंदुराव सुर्वे (वय 42, रा. जावकर प्लाझा, रत्नागिरी) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दशरथ सुर्वे यांनी न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात मुख्य न्यायदंडाधिकारी पिंगळे यांच्या चेंबरमध्ये सुर्वे व त्यांच्या पत्नी यांच्यात समुपदेशन (मेडिएशन) सुरू होते. समुपदेशनादरम्यान, दारुच्या नशेत असलेल्या दशरथ यांनी आरडाओरडा करत गोंधळ घातला. त्यामुळे न्यायालयीन वातावरण बिघडले.

या प्रकाराची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 85(1)(2) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2456141
Share This Article