खेड तालुक्यातील विकासकामासंदर्भात भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट

Gramin Varta
45 Views

खेड: भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर आणि भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांनी मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान खेड शहर, तालुका तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामे, नागरिकांच्या अडीअडचणी आणि प्रलंबित प्रश्न यांसारख्या स्थानिक व प्रादेशिक विषयांवर सविस्तर आणि मनमोकळा संवाद साधण्यात आला. क्षेत्रातील विकासाला चालना देण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

Total Visitors :
4595378
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *