प्रसिद्ध अभिनेते, निर्माते महेश मांजरेकर यांची देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाला भेट

Gramin Varta
4 Views

देवरुख: सुप्रसिद्ध सिने अभिनेते, निर्माते महेश मांजरेकर आणि  सचिन येडेकर यांनी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाला सोमवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोन्ही कलावंतांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले.

यावेळी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी या दोघांचेही शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार केला. यावेळी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व्यासपिठावर होते. यावेळी त्यांनी  स्वर्गीय काकासाहेब पंडित शैक्षणिक संकुल आणि विज्ञान केंद्रसंकुल, कलादालन पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आयत्या वेळी ठरलेली ही भेट देवरुख शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि आयकर विभागाचे उपायुक्त  मिलिंद कुलकर्णी यांनी घडवून आणली.        

हि विशेष भेट घडवुन आणल्याबदल्ल उपायुक्त मिलिंद कुलकर्णी यांचे संस्थेच्या वतीने विशेष धन्यवाद देण्यात आले. तर विद्यार्थी वर्ग देखील खुप होऊन भाराऊन गेला.

Total Visitors :
4632699
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *