कोंडगाव ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक मंजूर; ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांचे उपोषण मागे

Gramin Varta
116 Views

संगमेश्वर : तालुक्यातील कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांनी दिलेला उपोषणाचा इशारा अखेर यशस्वी ठरला असून प्रशासनाने दखल घेत ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक दिल्यामुळे त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम व आरोग्य सभापती विलास चाळके आणि पंचायत समिती देवरुख-संगमेश्वरच्या सभापती शर्वरी वेल्ये यांना ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देत येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची गंभीर दखल घेत अखेर कोंडगाव ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळाला आहे.

हा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या निदर्शनास ही संपूर्ण बाब आणून दिली. त्यानंतर आमदार सामंत यांनी कोंडगाव गावाची अडचण तातडीने लक्षात घेऊन त्वरित कायमस्वरूपी ग्रामसेवक उपलब्ध करून दिला. एखादे हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यशैली सर्वश्रुत आहे. या यशस्वी पाठपुराव्याबद्दल ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांनी आमदार किरण सामंत आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांचे विशेष आभार मानले आहेत.

- Advertisement -
Total Visitors :
4660503
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *